भारत हा एकमेव सुरक्षित देश हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने सिद्ध - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

धर्माच्या आधारे ज्यांचा शेजारील देशांमध्ये छळ झालेला आहे, त्यांच्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करण्यात आला. नुकत्याच अफगानिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतरामुळे ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे तेथील नागरिकांना भारत हा एकमेव असा एकच सुरक्षित देश समोर दिसत आहे हे या कायद्याने सिद्ध झाले आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांमुळे उदभवलेल्या भीषण परिस्थितीमुळे, तेथील शीख नागरिक संकटात सापडलेले होते. अशावेळी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भाजपा सरकारने, पवित्र श्री गुरुग्रंथ व शीख नागरिकांना सुखरूप भारतात आणले. तसेच सीएए अंतर्गत देखील शीख नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचा मार्ग खुला केला. या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार पुण्यातील शीख बंधू-भगिनींनी केला. नानापेठमधील क्वॉर्टर गेट येथील वायएमसीए हॉल येथे हा सत्कार समारंभ आयोजीत केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, केवळ हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती या समाजापुरतेच हा कायदा नसल्याचेही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशभरातून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलने करून विरोध होत असताना केंद्र सरकारने अद्यादेश काढून हा कायदा लागू केला. या नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर हिंसक आंदोलने झाल्यानंतरही मोदी सरकारने हा कायदा लागू केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com