Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण मोदी-शाहांना...”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने चर्चेचा एकच धुरळा

“आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण मोदी-शाहांना…”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने चर्चेचा एकच धुरळा

पुणे | Pune

महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरूवारी पुण्यात सत्कार झाला. पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुणे भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत एक वक्तव्य केलं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

- Advertisement -

आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण मोदी शाहांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. यावेळी त्यांनी राजू शेट्टींचाही उल्लेख केला आहे. चंद्रकांत पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात कोथरुड मतदारसंघामधून पाटील यांनी देण्यात आलेली संधी आणि त्यावरुन झालेला वाद याबद्दल भाष्य केलं. पक्षाने काहीतरी विचार करुन आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचा दावा करताना पाटील यांनी यापूर्वी आपण सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये काम केल्याचा दाखला दिला.

आपल्या नेतृत्वाखाली कशाप्रकारे आपण विरोधकांना पराभूत केलं यासंदर्भात माहिती सांगताना पाटील यांना हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपांचा उल्लेख केला. या निवडणूक प्रचारामध्ये राजू शेट्टी हे अनेकदा पंतप्रधान मोदींना शिवागाळ करत होते असा दावा पाटील यांनी केला. मात्र आपण शेट्टींना सव्वा लाख मतांनी हरवलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील राज्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा हा काळ होता. त्याचा संदर्भ देत ते बोलत होते.

पुढे बोलतांना पाटील म्हणाले, ‘परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि राजू शेट्टींची भेट झाली. त्यानंतर ते म्हणाले की, दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते माझ्याजवळचे असल्याने म्हणाले की, दादा कोणाला संपवत नाही. आईवडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवरून शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी शाहांना शिव्या देणं सहन करू शकत नाहीत.’

- Advertisment -

ताज्या बातम्या