Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या“हा तर हिरवा साप, आता रंग…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन चंद्रकांत...

“हा तर हिरवा साप, आता रंग…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे. या खोचक टीकेला ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केली आहे. सत्तार भाजपमध्ये आले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेण्यास विरोध केला. मेळावा घेऊन विरोध केला. तुम्ही आमच्याकडे त्याला ढकललं. त्याबदल्यात आम्हाला एक जागा एक्स्ट्रा दिली. उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वीकारलं. निवडूनही आणलं. एवढं झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात तो हिरवा साप आहे. म्हटलं हो. आता ही त्याला सिल्लोडमध्ये जाऊन हिरवा सापच म्हणेल. तो सापच नाही तर रंग बदलणारा सरडा आहे. माझ्या या विधानाशी मुस्लिम बांधवही सहमत आहेत. कारण सत्तार यांनी मुस्लिमांची जमीन हडप केली आहे, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

मी चिडलेलो आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही ठाकरे घराण्याला काही बोलत असतील तर आम्ही कसे ऐकून घेणार? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार नाही. शिंदेच्या हातात काही नाही. त्यांचं फक्त याच्या घरी जा, त्याच्या घरी जा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जुने मित्र आहेत. त्यांना सांगेल यांना काढून टाका. त्यांचा राजीनामा घ्या. फडणवीस यांना सवाल आहे. तुम्ही हे का सहन करता? तुम्हाला ही बेशिस्त आवडते का? तुमचे मंत्री असे असतील तर तुमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. अशा मंत्र्यांना किक आऊट करा, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या