उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भगतसिंह कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर; कोश्यारींचे राज्यपालपद जाणार?

उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भगतसिंह कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर; कोश्यारींचे राज्यपालपद जाणार?

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठीत कोश्यारींच्या बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळं सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. तर कोश्यारींविरोधात शिवप्रेमींनी राज्यभरात आंदोलनही केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com