केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा राहुल गांधींवर पलटवार

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधी आणि भाजप यांच्यात ट्विटर वॉर

दिल्ली | Delhi

देशात सध्या सुरू असलेल्या करोना संकट आणि राजस्थानमधील राजकीय उलथापालथ यांच्या दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील राहुल गांधीवर पलटवार केला आहे. त्यांनी राहुल गांधीचा गेल्या सहा महिन्यांतील मुद्यांवर ट्विटर द्वारे टीका केली आहे.

जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "राहुल गांधी यांनी गेल्या सहा महिन्यांतील त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी - शाहीन बाग आणि दंगली, मार्च - ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्यप्रदेश गमावले, एप्रिल - प्रवासी कामगारांना भडकावले, मे - कॉंग्रेसच्या ऐतिहासिक पराभवाची सहावा वर्धापनदिन, जून - चीनचा बचाव, जुलै - राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार कोसळण्याच्या मार्गावर."

तसेच "राहुल बाबांनीही भारताच्या कामगिरी लिहिल्या पाहिजेत. यामध्ये करोनाविरूद्ध युद्ध चालू आहे, सरासरी करोनामध्ये भारताची परीस्थिती इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगली आहे. तसेच मेणबत्त्या पेटवून आपण देशातील लोक व करोना योद्धाची चेष्टा केली आहे." असा टोला देखील लगावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com