Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत'

‘भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत’

मुंबई l Mumbai

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट करत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रिहानाने आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

तसेच, “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.” अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे.

सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ‘त्या’ ट्वीटची चौकशी होणार

दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष अतुल भातखळकर यांनीही अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. ‘देशमुखांना करोना झाला आहे, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते’, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण ?

पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केलं होतं. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या