ध्वजारोहण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनादिन साजरा

ध्वजारोहण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनादिन साजरा

जळगाव - Jalgaon :

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिना निमित्त आज पक्ष कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज जळगाव प्रमुख पक्ष कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कार्यालयात केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामीण अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विकास पवार, रवींद्र नाना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे युवक जाडो अभियान व संपर्क अभियान राबविण्याबाबत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निरीक्षक नेमून 500 शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. सदस्य रवींद्र पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे, संजय गरुड, वाल्मिक पाटील, विकास पवार, रमेश पाटील, मधुकर राणे, मजहर शेख, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, अश्विनी देशमुख, अरविंद मानकरी, दीपक पाटील, प्रशांत पाटील, आबा पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, ऐजाज मलिक, शिवराज पाटील, दिलीप माहेश्वरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील यांनी केले. तर आभार जिल्हा समन्वयक आबा पाटील यांनी मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com