'आप'च्या नेत्याला तुरुंगातही VVIP ट्रीटमेंट; खळबळजनक Video Viral

'आप'च्या नेत्याला तुरुंगातही VVIP ट्रीटमेंट; खळबळजनक Video Viral

दिल्ली | Delhi

मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांचा जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यात जैन एका बेडवर झोपलेले असून त्यांची मसाज करताना एक व्यक्ती दिसून येत आहे. या संबंधीचे तीन व्हिडिओ सद्या व्हायरल झालेले आहेत. यावरून मोठे राजकारण तापले आहे.

सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालीय. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचं ठिकाण बदललं आहे.

यापुर्वीही जैन यांना विशेष सुविधा तुरुंगामध्ये पुरवल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. डोक्याला मसाज, पायाला मजास करुन देण्याबरोबर पाठ चोळून देण्यासारख्या विशेष सेवा त्यांना तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून पुरवल्या जात होत्या. ईडीने या आरोपांसंदर्भातील पुरावेही न्यायालयामध्ये सादर केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com