अजित पवार-अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

चंद्रकांत पाटलांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
अजित पवार-अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

मुंबई / Mumbai - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांची सीबीआय (CBI) चौकशी करा, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सचिन वाझे (sachin vaze) प्रकरणातल्या अनेक गोष्टींचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. सचिन वाझे याला 2004 सालीच निलंबित करण्यात आले होते. मात्र, 2020 मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून 100 कोटी वसूल करण्यास सांगितले तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचे वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com