Friday, April 26, 2024
Homeराजकीयकाँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयचा छापा

काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयचा छापा

दिल्ली | Delhi

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सीबीआयने ही छापे टाकले आहेत. शिवकुमार यांच्या कर्नाटकासह मुंबई, दिल्ली येथील मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. शिवकुमार यांच्यावरील एका भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

सीबीआयच्या टीमने बंगळुरूमधील शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्याशी संबंधीत असलेल्या 15 इमारतींवर सुद्धा छापे मारले आहे. यात डोडालाहल्‍ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर मधील काही जुन्या घरांचाही यात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालय (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाकडून टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. याच दरम्यान ईडीच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली होती. त्यानंतर ईडीने ही माहिती सीबीआयला दिली. त्यातून सीबीआयने आज सोमवारी छापे मारले. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे भाऊ डीके सुरेश यांच्या संबंधात आलेल्या इमारतीवर सोमवारी सकाळी 6 वाजता छापा टाकला. या दोघांव्यतिरिक्त शिवकुमार यांचे निकटवर्तीय इकबाल हुसेन यांच्याही ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला आहे.

हे सूडाचे राजकारण – काँग्रेसचे नेते सिद्धारमय्या

‘भाजप नेहमी सूडाचे राजकारण करत आली आहे. लोकांचे लक्ष दूर हटवण्यासाठी भाजपने हा प्रयत्न केला आहे. डीके शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयने छापा मारून आमच्या पोटनिवडणूक तयारी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे’, असं म्हणत सिद्धारामय्यांनी निषेध केला आहे.

सीबीआयला येदीयुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराचा तपास करायला हवा – काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला

काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत, मोदी आणि येदीयुरप्पा सरकारकडून काँग्रेसला भीती दाखविण्याचा प्रयत्न सीबीआयद्वारे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सीबीआयला येदीयुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराचा तपास करायला हवा, पण ‘रेड राज’ या कपटनितीद्वारे त्यांचं काम चालतंय, असेही सुरजेवाला यांनी म्हटलंय. मोदी सरकारकडून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा आणि धमकविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या कपटनितीपुढे आम्ही झुकणार नाही, तर लोकांसाठी लढतच राहणार असल्याचा आमचा संकल्प आहे, असेही सुरजेवाला यांनी ट्विटररुन म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या