Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यालालू प्रसाद यादव यांच्या घरासह १७ ठिकाणी सीबीआयचा छापा

लालू प्रसाद यादव यांच्या घरासह १७ ठिकाणी सीबीआयचा छापा

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या महिन्यामध्येच चारा घोटाळा (Fodder scam) प्रकरणात जामीन मिळालेल्या लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे….

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) लालू यादव यांच्याशी संबंधित १७ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवींसह मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई केली आहे. लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

याबाबत सीबीआयने सांगितले की, दिल्ली, भोपाळ, पाटणा आणि गोपालगंजमधील ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर यूपीए सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री असताना लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लाच म्हणून भूखंड स्वीकारल्याचा आरोप आहे.

दरम्यान, यादव कुटुंबियांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांचा निषेध करत आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पटणाच्या रस्त्यावर उतरले आहेत. लालू यादव यांचे भाऊ प्रभुनाथ यादव यांनी सीबीआयच्या या कारवाईवर टीका केली असून हा आरजेडी प्रमुखांना अडचणीत आणण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या