Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे पोलिसांना दिले 'हे' आदेश

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आलीय.

- Advertisement -

नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असा आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिला आहे. एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वतः वाशीम कोर्टात दाखल होत २४ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. तसेच जामिन अर्जदेखील कोर्टाने फेटाळली आहे.

समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. संबंधित प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बनाव रचला होता, असाही आरोप करण्यात आला होता.

नवाब मलिकांकडून समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक दावे केले होते. त्यांनी समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या