Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' ट्विटमुळं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

‘त्या’ ट्विटमुळं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एक आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत होती. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईचा मागणी केली होती.

प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

राऊत यांनी ट्विट करुन म्हटले होते की, देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!

संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात?” असे सवाल चित्रा वाघा यांनी संजय राऊत यांना विचारला.

राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, काय आहे प्रकरण?

- Advertisment -

ताज्या बातम्या