कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पुणे | Pune

काल (२६ फेब्रुवारी) कसबा (Kasba) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election) मतदान पार पडले. त्यानंतर आज (२७ फेब्रुवारी) एक मोठी बातमी समोर आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबापेठ मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी काल नूतन मराठी विद्यालयातील बुध क्रमांक ७५ जाऊन मतदान केले होते. मात्र, यावेळी त्यांनी गळ्यात कमळाचे चिन्ह असलेला उपरणं घातलं होते. याप्रकरणी विरोधकांनी आक्षेप घेत रासने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता.

कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
तुम्हाला माहिती आहे का? 'स्वर्गदारा’तील तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले आहे..

यासंदर्भात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून (Election Commission Officer) हेमंत रासनेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, परिचारिकेच्या तक्रारीनंतर कारवाई

या बाबत हेमंत रासने एका वृत वाहिनीशी बोलतांना म्हणाले की मतदानाला जातांना त्यांचा गळ्यात कमळ चिन्हाचं उपरणं होते. दरम्यान, त्यांना केंद्रावरील कुठल्याच अधिकाऱ्याने या बाबत अडवले नाही. मात्र, दरम्यान, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर गळ्यातील कमळ चिन्हाचं उपरणं काढून टाकले असे ते म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
क्रूरतेच्या सर्व सीमा पार..! प्रेयसीला मेसेज केल्याने मित्राचीच केली हत्या; हृदय काढलं, गुप्तांग छाटलं अन् फोटो...

दरम्यान , काल मतदानाच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर आणि विष्णु हरीहर यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी समर्थ पोलिस ठाण्यात देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील मतदारांना भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com