शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडणे भोवले; राणे पुत्रांविरोधात गुन्हा दाखल

शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडणे भोवले; राणे पुत्रांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव दाऊद इब्राहीमशी (Dawood Ibrahim) जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव दाऊद इब्राहीमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे तसेच समाजात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे निलेश आणि नितेश राणे यांनी केले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आझाद मैदान (Azad Maidan) येथे राणे पुत्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान निलेश राणे म्हणाले होते की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मालिकांचा (Nawab Malik) राजीनामा का घेत नाही? यामागे काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा मला संशय असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी म्हणतच राहणार. शरद पवार हे दाऊदची व्यक्ती आहे याबाबत मला संशय आणि राहणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com