अमरावतीतील जंगी मिरवणूक राणा दाम्पत्याला पडली महागात

अमरावतीतील जंगी मिरवणूक राणा दाम्पत्याला पडली महागात

अमरावती । Amravati

तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीमध्ये (Amravati) परतलेल्या रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांचे काल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. राणा समर्थकांनी मंत्रोच्चाराच्या गजरात राणा यांना दुग्धाभिषेक घातला. तसेच उत्साही कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी तब्बल एक क्विंटलचा हार आणला होता.

मात्र, हा हार घालण्यासाठी जी क्रेन आणली होती. ती विनापरवाना आणल्याप्रकऱणी तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्यासह १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात (City Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

राणा दाम्पत्याचे नागपूर ते अमरावती (Nagpur to Amravati) या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर राणा दांपत्याची स्वागत मिरवणूक राजकमल चौकात पोहचली.‍

तर इर्विन चौकात राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी भीम ब्रिगेडचे (Bhim Brigade) कार्यकर्ते जमले होते, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या (Yuva Swabhimani party) कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राणा दांपत्याचे स्वागत भल्या मोठ्या हाराने करण्यात आले. यावेळी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला.

दरम्यान, राणा दाम्पत्याने रवीनगर परिसरातील हनुमान मंदिरात (Hanuman Temple) पोहचून हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण आणि आरतीत सहभाग घेतला. तसेच रात्री १० ते १२ वाजेपर्यंत साउंडवर कार्यक्रम घेतल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) नियमांचे उल्लंघन केल्याने राणा दाम्पत्यावर अमरावतीमधील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com