Sunday, April 28, 2024
Homeराजकीयकाँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही- यशोमती ठाकूर

काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही- यशोमती ठाकूर

पुणे |प्रतिनिधी| Pune

ज्या तिसरी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, ती आघाडी काँग्रेस विरहित झाली, तर ती बळकटीपासून दूर राहील. काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

‘लडकी हूं लड सकती हूं’ या कार्यक्रमास १२५ दीवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेस कमिटीच्यावतीने महिला रॅलीचे आयोजन पुण्यातील गुडलक चौक येथे करण्यात आल होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी दिलेला नारा ‘लडकी हूं लड सकती हूं’, स्त्री शक्ती स्त्री सन्मान पूर्ण भारत देशातील मुली आणि स्त्रिया आपल्या अधिकारासाठी लढू शकतात, हा संदेश या घोषणेतून त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

काल तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी ही भेट महत्त्वाची मानली जात असून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत यशोमती ठाकूर यांना विचारलं असता, ‘आज संघी विरोधात जे वातावरण निर्माण झालं आहे, ते काँग्रेसमुळेच तयार झाला आहे, त्यामुळे काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी शक्य नाही’, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ही मोहीम सुरू केली असून त्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत. त्यांनी जो नारा दिला आहे. त्या नाऱ्यामुळे आमच्यातदेखील ऊर्जा मिळत आहे. हे आंदोलन राज्यातच नव्हे, तर देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जात आहे, तसेच देशाचं संविधान कधीही एवढ्या धोक्यात आलं नव्हतं जेवढं आज आलं आहे, केंद्रसरकारच्या जेवढ्या एजन्सी आहे, त्याचा दुरूपयोग आज देशभरातील राज्यात सुरू आहे. याआधी देशाचं संविधान कधीही एवढ्या धोक्यात आलं नव्हतं जेवढं आज केंद्रातील सरकारमुळे आलं आहे, असा आरोपही ठाकूर यांनी केला.

महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे,आमदार संग्राम थोपटे,माजी गृहराज्यमंत्री शहर अध्यक्ष रमेश बागवे,पुणे शहर महिला अध्यक्षा पूजा आनंद,संगीता तिवारी उपस्थित होते. तर यावेळी तरुणी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या