उमेदवारीसाठी उरले अवघे तीन दिवस !

इच्छुक आणि पॅनल प्रमुखांची धावपळ
उमेदवारीसाठी उरले अवघे तीन दिवस !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील 797 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. त्या निमित्ताने रणधुमाळी सुरू झाली आहे.

तीन दिवस सुट्ट्या असल्याने आता आज सोमवार पासून अवघे तीन दिवस उरले असल्याने इच्छुक उमेदवार आणि पॅनेल प्रमुखांची धावपळ उडणार आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 797 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 30 जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची तारीख आहे. आता सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने अवघे तीन दिवस राहिले आहेत. या दिवसांत इच्छुकांना सर्व कागदपत्रांसह उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पॅनेलमधील उमेदवार ठरविण्यासाठी प्रमुखांना कसरत करावी लागत आहे.

‘थर्टी फस्ट’चा खर्च उमेदवारांवर

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात 31 डिसेंबर आला असून यामुळे तरूण मतदारांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. जिल्ह्यात अनेक गावात 31 डिसेंबरची तयारी निवडणुकीतील उमेदवारांनी सुरू केली आहे. यासाठी हॉटेल, फार्म हाऊस, विश्वासू कार्यकर्त्यांच्या घरी तिखट आणि खार्‍या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांचा यंदाचा 31 डिसेंबर चांगलाचा गाजणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com