Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? - अजित पवार

आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? – अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) –

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानं लालबहादूर शास्त्री यांचा रेल्वे अपघात झाल्यानंतर त्याची जबाबदारी घेत राजीनामा दिल्याचा दाखला देत

- Advertisement -

आता काय घडते आहे हे आपण पहातोच आहोत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते सांगत आरोप होत असलेल्या मंत्र्यांचे नाव न घेता टिप्पणी केली. लालबहादूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या- त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले आहेत. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पुणे शहर पोलिस मुख्यालयातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पूजा सावंत या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाबाबत विचारले असता पवार म्हणाले, कोणत्याही घटनेचा तपास अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य बाहेर येत असताना जर कोणाची चूक असेल तर त्याला शासन झाले पाहिजे. पण अंतिमत: चौकशीतून सत्य बाहेर येईल. त्यावर पूजा चव्हाण प्रकरणी संबधित मंत्री नॉट रिचेबल आहेत. बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घटनेत प्रतिक्रिया दिली. आता नेमकं काय झालं? त्यावर जेव्हा मी त्यांना भेटेन. तेव्हा त्यांना नक्की सांगेन की माध्यमातील मंडळी तुमची आत्मीयतेने वाट पाहत आहेत. एकदा पुढे या अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळ्यात अडकवले याविषयी विचारल्यानंतर पवार यांनी यामध्ये तथ्य असेल तर कारवाई नक्की होईल. आता ज्या गोष्टी झाल्या त्या उगाळणं चांगलं नाही असे सांगून अजित पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

पेट्रोल इंधन दरवाढीबाबत मागच्या सरकारवर खापर फोडले जात आहे, त्याविषयी बोलताना पवार यांनी या सरकारला जनतेने निवडून दिले आहे. मागच्या सरकारने जर काही चुका केल्या असतील तर त्यात सुधारणा करण्याचे काम या सरकारचे आहे. एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यात काही अर्थ नाही. परभणीमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपयांच्या पुढे गेले आहेत. ते कमी झाले पाहिजेत. भाजपच्या पक्षातील लोकांना पण हे वाटत आहे. पण कुणी बोलू शकत नाही. ही दरवाढ कमी झालीच पाहिजे ही माझीच नाही तर सर्वसामान्यांची भावना आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त होऊन गेला आहे. ज्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मांडेन त्यावेळी कोणत्या गोष्टीचा टॅक्स वाढवणार आणि कोणता कमी करणार हे निश्चित सांगेन

राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कोरोनाचे कारण पुढे करीत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे याकडे लक्ष वेधले असता जर आम्ही घाबरलो असतो तर आम्ही राजीनामा देऊ दिला असता का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला आहे. विरोधक सातत्याने हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात. विरोधक सारखे तीन महिने वाढवत आहे. आता सरकारला सव्वा वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाल पूर्ण करेल. तिन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत. पवार साहेबांचे आम्ही मार्गदर्शनही घेत आहोत असे अजितदादा म्हणाले.

पोलिसांचा वचक सामान्यांवर नाही तर तो गुंडांवर असला पाहिजे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे पोलिसांना सुनावले आहे. एका गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या गुंडांची तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक निघाली ही शहराच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं नाही. तरुण पिढीपुढे आपण चुकीचा आदर्श ठेवत असून, ते घातक आहे. पुन्हा अशा घटना घडता कामा नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. पोलिसांचा वचक सामान्यांवर नाही तर तो गुंडांवर असला पाहिजे असे सांगत अशा लोकांना पोलिसांनी पाठीशी घालता कामा नये अशी तंबी दिली.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात अनुकंपा भरती पोलीस पाल्याना प्रातिनिधिक स्वरुपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच नागरिकांना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या