
पुणे | Pune
भाजपच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं कर्करोगाने निधन झाल्यामुळे दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. आता कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे...
कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी पुकारलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
दाभेकर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर दाभेकर यांनी बदललेल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, गेल्या 40 वर्षांपासून मी पक्षासाठी काम करत आहे. मला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी उमेदवारी नाकारण्यात आली. मी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे बंड पुकारले होते.
मात्र एका कार्यकर्त्याला जेव्हा राहुल गांधी यांचा फोन येतो, ही अत्यंत गर्वाची बाब आहे. म्हणूनच मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.