ममता सरकारमध्ये फेरबदल; जाणून घ्या कोणी घेतली मंत्री पदाची शपथ

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या मंत्रिमंडळात बदल केले आहेत. या नव्या मंत्रिमंडळात एकूण ०९ नवीन मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. (Mamata Banerjee cabinet)

यामध्ये बाबुल सुप्रियो यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय स्नेहशिष चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा, प्रदीप मजुमदार, तजमुल हुसेन, सत्यजित बर्मन, बिरबाह हंसदा आणि बिप्लब रॉय चौधरी यांनी स्वतंत्र प्रभारासह मंत्री म्हणून शपथ घेतली.

नवीन मंत्रिमंडळात पाच कॅबिनेट, दोन स्वतंत्र प्रभार आणि दोन राज्यमंत्री करण्यात आले आहेत. बाबुल सुप्रियो आणि पार्थ भौमिक यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com