Bypoll Results 2021 : ममतांचा आज फैसला

ममता बॅनर्जी यांच्यासाठी का आहे निवडणूक महत्वाची?
Bypoll Results 2021 : ममतांचा आज फैसला

कोलकाता | Kolkata

आज ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. पश्चिम बंगालची कमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातात राहिल की नाही याचा निर्णय आज होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसह जग्नीनपूर आणि समशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात भवानीपूर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री पदी राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासाठी भवानीपूर जागेवर विजय मिळवणे फार महत्वाचे आहे. मात्र भाजपाच्या प्रियांका तिब्रेवाल यांनी त्यांना कडवी लढत दिली आहे. नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक हरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जागेवरून निवडणूक लढवली आहे.

भवानीपूर मतदारसंघासाठी ५७ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या प्रियांका तिब्रेवाल आणि सीपीएमचे श्रीजीव विश्वास यांचे आव्हान आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी का आहे निवडणूक महत्वाची?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये तृणमूलला घवघवीत यश मिळालं असलं तरी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजे भवानीपूरमधून निवडणूक लढवण्यास प्राधान्य दिलं. या ठिकाणचे आमदार सोभन देव चटोपाध्याय आता खरदाह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या आधी भवानीपुरातून दोन वेळा विजय प्राप्त केला आहे.

Related Stories

No stories found.