Bypoll Result : शिवसेनेचे सीमोल्लंघन, दादरा नगर हवेलीत ऐतिहासिक विजय

Bypoll Result : शिवसेनेचे सीमोल्लंघन, दादरा नगर हवेलीत ऐतिहासिक विजय

मुंबई | Mumbai

दादरा नगर हवेलीचे (dadra and nagar haveli) खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी मुंबईत (Mumbai) आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं (Shivsena) मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली.

दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.

या निवडणुकीच्या काही दिवस आधीच कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीसाठी शिवसेने जोर लावला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या.

दिवंगत खासदार मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत सात वेळेस निवडून आले होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजप खासदार नथुभाई पटेल यांचा ९००० मतांनी पराभव केला होता. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.

Related Stories

No stories found.