बस खरेदी निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा
बस खरेदी निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही !

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

मुंबई महानगर पालिकेच्या इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिला.

मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिक बस खरेदीच्या संदर्भात भाजप आमदार अमित साटम आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. या निविदा प्रक्रीयेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या(सीव्हीसी) मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झालेले नाही, असे बेस्ट प्रशासनाने कळवले आहे.

निविदा प्रक्रीयेतील पात्रता अट बदलल्यास सीव्हीसीच्या तत्वानुसार पुरेशी मदत घ्यावी लागते. पण इलेक्ट्रिक बसच्या निविदेमध्ये या तत्वांचे उल्लंघन झालेले नाही, असे बेस्ट प्रशासनाने कळविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com