अयोध्येत पाय ठेवूनच दाखवा; राज ठाकरेंना भाजप खासदाराचा इशारा

अयोध्येत पाय ठेवूनच दाखवा; राज ठाकरेंना भाजप खासदाराचा इशारा

मुंबई | Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) विरोध दर्शवला आहे. यूपीतील (UP) जनतेची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत (Ayodhya) प्रवेश न देण्याची मागणी त्यांनी केली आहे....

राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर येणार असून ते रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

अयोध्येत पाय ठेवूनच दाखवा; राज ठाकरेंना भाजप खासदाराचा इशारा
कट उधळला! चार दहशतवाद्यांना अटक, मोठा दारुगोळा जप्त

उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. त्यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी विनंती ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com