दोंडाईचा येथे होत असलेल्या ऑक्सिजन प्लँटला बूस्टर बसवावे : आ. जयकुमार रावल

जयकुमार रावल
जयकुमार रावल

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

येथील उपजिल्हा रुग्णालयात उभार येत असलेल्या मेडीकल ऑक्सिजन प्लँटला बूस्टर बसविण्यात यावे, अशी मागणी माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व मागील काळात ऑक्सिजनची कमतरता या गोष्टी लक्षात घेता भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने ह्या अडचणी येवू नये म्हणून धुळे जिल्ह्यात तालुकास्तरावर होत असलेल्या तसेच दोंडाईचा सह, शिंदखेडा येथील हवेतून तयार होत असलेल्या ऑक्सिजन प्लँटला प्रशासकीय मंजुरी देखील मिळाली आहे.

त्यात दोंडाईचा येथे होत असलेल्या प्लँटला बूस्टर बसविण्यात यावे. कारण दोंडाईचा हे लोकसंख्याच्या दृष्टीने मोठे शहर हे धुळे व नंदुरबार जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. दोन्ही जिल्ह्यांचे रुग्ण हे दोंडाईचा शहरात उपचारासाठी दाखल होत असतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.

अशावेळी ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत होती. खाजगी दवाखान्यात सुद्धा ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. भविष्याची संभाव्य परिस्थिती पाहता ऑक्सिजन प्लँटला बुस्टर बसविल्यास त्या प्लँटमधून अतिरिक्त सिलेंडर ही भरण्यात येतील. ते भरलेले सिलेंडर इतर ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णालयात किंवा इतर कोविड सेंटरला देखिल पुरवण्यात येतील.

यामुळे बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर मागवण्याची गरज भासणार नाही. तालुका ऑक्सिजनसाठी स्वयंपुर्ण होतील. व यातून रूग्णांची मोठी सोय होईल. त्यामुळे बूस्टरला प्रशासकीय मंजुरी मिळावी, अशी मागणी आ. रावल यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com