Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याINS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

INS विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई | Mumbai

INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात (Ins vikrant fund case) भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

आज किरीट सोमय्या यांच्‍या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण (protection from arrest) दिले आहे.

तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे किरीट सोमय्या यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत (ins vikrant) फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या