काँग्रेसला मोठं खिंडार; ८ आमदार भाजपाच्या वाटेवर

आजच करणार प्रवेश?
काँग्रेसला मोठं खिंडार; ८ आमदार भाजपाच्या वाटेवर

पणजी | Panji

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षाचे ८ आमदार गोवा विधानसभेत पोहोचले असून. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपच्या वाटेवर जात आहेत.

'हे' आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलियालाह लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, संकल्प आमोणकर, रुडोल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा

पक्षीय बलाबल किती?

गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे २० आमदार आहेत. तर, काँग्रेसकडे ११ जागा आहेत. त्याशिवाय, महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाकडे दोन, गोवा फॉरवर्ड पक्षाचा एक आमदार आहे. तर, अन्य पक्षांकडे सहा जागा आहेत. काँग्रेसचे ८ आमदार भाजपात सामिल झाल्यास काँग्रेसकडे ३ आमदार शिल्लक राहतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com