पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर फेकली काळी शाई

राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्षांसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर फेकली काळी शाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढविरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत पेट्रोलपंपावरील बॅनरवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर काळी शाई फकून मोदी हटाव, देश बचाव अशी घोषणाबाजी केली.

शहरातील मोहाडी रोड येथील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदेश प्रवक्ता, कार्याध्यक्ष यांच्यासह 20 जणांविरोधात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नियमांचे उल्लंघनकेल्याप्रकणी शनिवारी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहाडी रोड येथील पेट्रोलपंप येथे इंधनदरवाढीविरोधात आज शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर शाई फेकून आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनीष जैन, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विकास पाटील, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, अल्पसंख्याक महानगर उपाध्यक्ष सैय्यद इरफान, अ‍ॅड. कुणाल पवार, गौरव लवंगणे, जितेंद्र चांगरे, दिलीप माहेश्वर, अमोल कोल्हे, किशोर सुर्यवंशी, शंभू रोकडे, पंकज बोरोले, नितीन जाधव, रोहित सोनवणे, कल्पना पाटील, उज्ज्वला शिंदे, उज्ज्वला मगर, ममता तडवी, कमल पाटील याच्यासह 15 ते 20 जणांविरोधात पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी धुमाळ करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com