शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार

मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय उत्तर देणार?
शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार

मुंबई | Mumbai

काल शिवसेनेने (Shivsena) मुंबईत सभा आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली....

शिवसेनेच्या सभेपाठोपाठ आज भाजपच्या (BJP) 'उत्तर' सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने मुंबईत (Mumbai) सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये (nesco center goregaon) ही सभा होणार आहे.

शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार
केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र दिनी भाजपने बुस्टर डोस सभा आयोजित केली होती. आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला करारा जबाब देणार, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

काय केले ट्विट?

शिवसेनेपाठोपाठ भाजपची आज 'उत्तर' सभा; फडणवीसांची तोफ धडाडणार
Visual Story : ११ वर्षानंतर शर्मिला टागोर बॉलिवूडमध्ये; 'या' चित्रपटात झळकणार

उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप (BJP), हिंदुत्व (Hindutva) या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. आता आज होणाऱ्या भाजपच्या 'उत्तर' सभेत फडणवीस काय बोलणार? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.