उपमहापौरपदी भाजपाचे सुनील खडकेंची निवड बिनविरोध

उपमहापौरपदी भाजपाचे सुनील खडकेंची निवड बिनविरोध

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीसाठी भाजपचे सुनील खडके यांचे एकमेव अर्ज दाखल आल्याने अवघ्या काही मिनिटातच त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बुधवारी 11 रोजी मनपाच्या सभागृहाच्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कामकाज पहिले. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी उपमहापौर निवडीची घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, आयुक्त कुलकर्णी उपस्थित होते. नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी 10 रोजी अंतिम मुदत होती, भाजपकडून सुनील खडके यांचेच दोन अर्ज दाखल झाले होते.

त्यामुळे त्यांचीच निवड बिनविरोध होणार हे एक दिवसाआधीच निश्चित झाले होते. बुधवारी ही औपचारिकता पार पडली आणि सुनिल खडके यांचे नाव घोषित केले. खडके यांचे स्वागत जिल्हाधिकारी यांनी केेले.

याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सदाशिव ढेकळे, माजी नगरसेवक वामनराव खडके, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, नगरसेविका रेश्मा काळे, शुचिता हाडा, सरिता नेरकर, कैलास सोनवणे, चेतन सनकत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खडके यांनी स्वीकारला पदभार

यानंतर उपमहापौरांच्या दालनात त्यांना नेवून त्यांच्या पदावर त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी विराजमान केले यानंतर सुनील खडके यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील हेही उपस्थित होते. खडके यांनी निवडीची घोषणा होताच वडील वामनराव खडके यांचे आशीर्वाद घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com