Rajasthan : पुन्हा हवा गरम ! भाजपने घेतला हा निर्णय

jalgaon-digital
2 Min Read

जयपूर | Jaypur : काँग्रेसमधील वाद शमल्याने सुस्कारा सोडणार्‍या मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यासमोर पुन्हा नवे संकट उभे झाले आहे. शुक्रवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. भाजपने ( BJP ) पहिल्याच दिवशी अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केल्याने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. यामुळे गेहलोत सरकारसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

गेल्या महिनाभरापासून राजस्थानातील राजकारण हेलकावे खात आहे. काँग्रेसमधील बंडखोर गटाच्या भुमिकेमुळे काँग्रेसचे (Congress) सरकार संकटात होते. यावरून दिर्घ राजकीय नाट्य रंगले.

बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachi Pilot) यांनी तलवार म्यान केल्याने काँग्रेसचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारे सत्र मुख्यमंत्री गेहलोत विजयी मुद्रेत हाताळलीत, असा अंदाज होता.

काँग्रेसमधील राजकीय ओढाताण

सुरू असताना शांत असलेल्या भाजपने आता अविश्वास ठरावाचे अस्त्र बाहेर काढले आहे. गुरूवारी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ( Vasundhara Raje )सहभागी होत्या.

काँग्रेस सरकार पडणार

राज्यातील काँग्रेस सरकार लवकरच पडणार आहे, असे भाजप नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे.

संख्याबळानुसार गहलोत सरकार सुरक्षीत

दरम्यान, 200 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. तर भाजप व मित्रपक्षांचे 76 आमदार आहेत. संख्याबळानुसार गहलोत सरकार सुरक्षीत असले तरी मध्यंतरीच्या नाट्यामुळे सरकारचे काय होईल, यावरून राजस्थानचे राजकारण ढवळून निघाले आहे.

राजस्थान काँग्रेसमधील डागडुजीने वेग घेतला आहे. सचिन पायलट गटाचे नेते भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांचे निलंबन पक्षाकडून मागे घेण्यात आले आहे. प्रभारी अविनाश पांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *