Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयभाजप महिला आघाडीचे चक्का आंदोलन दडपले !

भाजप महिला आघाडीचे चक्का आंदोलन दडपले !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज शनिवारी महामार्गावर आकाशवाणी चौकात विना परवानगी चक्का जाम आंदोलन करण्याचा भाजप महिला आघाडीचा प्रयत्न पोलिसांनी हाणूून पाडला.

- Advertisement -

भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती अश्वीन चिरमाडे (42,रा.रिंगरोड, जळगाव), नगरसेविका उज्ज्वला किरण बेंडाळे (43,रा.रामानंद नगर), रेखा लक्ष्मीनारायण वर्मा (52), भाग्यश्री सुभाष चौधरी (60) व लताबाई बाविस्कर (38) यांना जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक करुन सुटका केली.

याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबंधित पाच महिलांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 68, 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोषणाबाजी करत आंदोलनाचा प्रयत्न

आंदोलनासाठी आज दुपारी भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा, भाग्यश्री चौधरी, लताबाई बाविस्कर, नगरसेविका प्रतिभा कापसे, ज्योती बरगे, सुरेखा बारी, शोभा बारी यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी करत पोलिसांना न जुमानताच आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संबंधित महिलांना आंदोलन करण्यापूर्वी अटक केली व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा दिप्ती अश्वीन चिरमाडे , नगरसेविका उज्ज्वला किरण बेंडाळे , रेखा वर्मा , भाग्यश्री चौधरी व लताबाई बाविस्कर यांना अटक करण्यात येवून त्यांची सुटका करण्यात आली. तसचे त्यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात वरील मुंबई पोलीस कायदा 68, 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा फौजफाटा तैनात

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असून राजीनामा व गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा भाजप महिल आघाडीतर्फे शनिवारी आकाशवाणी चौकात महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून अपर

पोलीस अधीक्षकांसह जिल्हापेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्याचा अधिकारी व कर्मचार्‍यांचा फौजफाटा आकाशवाणी तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या