Saturday, April 27, 2024
Homeराजकीयभाजपची आज राज्यभर निदर्शने

भाजपची आज राज्यभर निदर्शने

मुंबई | प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराच्या विरोधीत आज, बुधवारी भाजपच्यावतीने राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सूडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

ही लोकशाहीची हत्या असून त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल. लोकशाहीबद्दल आस्था असलेल्या सर्व नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या