पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही

- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना ( Flood victims in Konkan and Western Maharashtra ) भारतीय जनता पक्षाकडून ( Bharatiya Janata Party ) सर्वतोपरी मदत केली जात असून पूरग्रस्तांच्या मदतीत भाजप कमी पडणार नाही, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis )यांनी शनिवारी दिली.

आज भाजप प्रदेश कार्यालयात फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग( Former Minister of State Kripashankar Singh ) यांच्या तर्फे पूरग्रस्तांसाठीचे मदत साहित्य रवाना करण्यात आले. या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त भागासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भाजपकडून आतापर्यंत २० ते २५ मदत सामुग्री देण्यात आली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे मदत साहित्य पाठविले आहे. या साहित्यात भांडीकुंडी, अन्न पदार्थ , चटया, कपडे, पिण्याचे पाणी याबरोबरच सायकलचाही समावेश आहे. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी आमदार अतुल शाह, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पाण्डेय आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com