भाजप स्वबळावरच सत्तेत येणार

भाजप स्वबळावरच सत्तेत येणार
देवेंद्र फडणवीसराजकीय

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

भाजपच्या (BJP) विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला आहे. तर दुसरीकडे भाजपला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे....

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या (Shivsena) पुणे जिल्ह्यातील नेत्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके (Asha Buchke) यांनी आज फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा दावा केला.

राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे.

आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू. आशा बुचके यांच्या सारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपमध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपमध्ये आशाबुचकेंचा सन्मान केला जाईल. भाजपमध्ये आतला-बाहेरचा, जुना-नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.


आशा बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपमध्ये (Bharatiya Janata Party) त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com