फुग्याला भोक तुमच्या पडले आहे - चंद्रकांत पाटील

फुग्याला भोक तुमच्या पडले आहे - चंद्रकांत पाटील

पुणे |प्रतिनिधी|Pune

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे वाक्य चुकलेले नाही. थोबाडीत मारली असती, हा कॉमन संवाद आहे. जर एखादी गोष्ट चुकली, तर राणेंना (Union Minister Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था असल्याचे म्हणत राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या वक्तव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी समर्थन केले आहे. दरम्यान, फुग्याला भोक तुमच्या पडले आहे, तुमच्या सामनाला किंमत देत नाही. राऊत (Raut) साहेब तुमच्यावर देखील आरोप (Allegations) झाले आहेत, त्याचे पण बघा, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) पुढे म्हणाले की, काल दिवसभरात झालेला राजकीय कलगीतुरा सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झाले. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. दोनदा एसपीकडे हजेरी लावण्यास सांगितले. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना भान राखले पाहिजे, असे सांगण्यात आले. शेवटी विजय सत्याचा झाला आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) सारखे न्यायालयाच्या थपडा खात असल्याचेही पाटील (BJP state president Chandrakant Patil) म्हणाले.

राणेंना मुंबईत (Mumbai) प्रतिसाद मिळाला, मुंबई हरली तर? मुंबईत पोपटाचा प्राण आहे. भाजप (BJP) मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही. राणेंची(Union Minister Narayan Rane) तब्येत खराब झाली, ते जेवत असताना त्यांच्याकडून ताट हिसकावून घेतले हे अमानवीय आहे. पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, त्यामुळे एक दिवस आराम करतील आणि लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल, असे त्यांनी सांगितले.

आमच्या वेळीच कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चालते आहे. सगळे ड्राफ्टिंग झाले असून लवकरच परब (Anil Parab) यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com