पोटनिवडणुकीत आधीच्या उमेदवारांनाच संधी द्या

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या धुळे जिल्हा भाजपाला सूचना
पोटनिवडणुकीत आधीच्या उमेदवारांनाच संधी द्या
चंद्रकांत पाटील

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडुन आधीच्या उमेदवारांना संधी द्या, अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुळे जिल्हा भाजपाला दिल्या आहेत.

सर्वोच न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणल्याच्या निर्णया नंतर ओबीसी प्रवर्गातुन निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यानंतर त्याजागी पोटनिवडणुका लागल्या असून यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुळे जिल्हा भाजपाला सूचना दिल्या असून त्यात भाजपकडून पोटनिवडणुकीत मागील निवडणुकीत ज्या उमेदवारांना संधी देण्यात आली होती, त्याच उमेदवारांना संधी द्यावी.

मागील निवडणुकीत जनतेने ज्यांना स्विकारुन निवडून दिले आहे परंतु राज्य सरकारच्या चुकीमुळे न्यायलयीन प्रक्रिमुळे त्यांना एका वर्षात रद्द व्हावे लागले आहे, यात त्या सदस्यांची कोणतीही चुक नसतांना त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.

अशा त्याच उमेदवारांना संधी द्यावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुळे जिल्हा भाजपाला केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com