आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी; विरोधकांना रोखण्यासाठी आखली 'ही' खास रणनिती

आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी; विरोधकांना रोखण्यासाठी आखली 'ही' खास रणनिती

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकता त्यामुळे राज्यातील सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसली असून यात सोशल प्रत्येक पक्षाकडून सोशल मिडीयाचा (Social Media) मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असतो. त्यातच भाजपाने आगामी निवडणुकांसाठी वेगळी रणनिती आखली आहे...

भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली असून आता सोशल मीडियावर प्रभावी पकड असलेले इन्फ्लुन्सरही (Social Media Influecers) प्रचाराच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे.

२०२४ मध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे, त्या पार्श्वभुमिवर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया इन्फ्लुन्सरला आदेश दिले आहे. गरवारे क्लबमध्ये भाजप नेते आणि ३०० हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुन्सरची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस बोलत होते.

आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी; विरोधकांना रोखण्यासाठी आखली 'ही' खास रणनिती
Train Accident : ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात! २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक प्रवासी जखमी

भाजपने आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकांमध्येही भाजप सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची शक्यता आहे. काल मुंबईतील गरवारे क्लबमध्ये ३०० सोशल मीडिया इन्फ्लुन्सर, भाजप नेते यांची बैठक पार पडली यात देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत.

या बैठकीमध्ये युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक व इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हजेरी लावली होती. मोदी सरकारच्या चांगल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करावे, व्हिडीओ, रील्स तयार कराव्या आणि त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात. यात सोशल मीडियाचा जास्तीत जास्त प्रसारीत करण्याचे आदेश या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना देण्यात आले आहेत. सरकारच्या गेल्या 9 वर्षांतील कामगिरीवर इन्फ्लुन्सर प्रकाश टाकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com