भाजप युवा मोर्चा दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजप युवा मोर्चा दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय जनता युवा मोर्चा, अहमदनगर (दक्षिण) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या कार्यकारिणी सदस्य निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे नगर दक्षिणचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी ही युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी व सदस्य यांच्या निवडी केल्या आहेत. त्यात सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, चार चिटणीस, एक खजिनदार, व 18 सदस्य अशी नवीन कार्यकारिणीची यादी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

उपाध्यक्ष- पदी शिवाजी बेरड (नगर), अमोल सदाशिव शेलार (श्रीगोंदा), तुषार अनिल पवार (पारनेर), उमेश वसंतराव भालसिंग (शेवगाव) महेंद्र नारायण तांबे (राहुरी) धनंजय नारायण मोरे (कर्जत) सरचिटणीस- अक्षय शिवाजीराव कर्डिले (नगर), दत्तप्रसाद राजेंद्र मुंदडा (राहुरी), अ‍ॅड. प्रवीण सानप (जामखेड), अमोल अशोक गर्जे (पाथर्डी), चिटणीस- अनिल मारुती गदादे (कर्जत), गणेश बबन कराड (शेवगाव), सचिन बाबासाहेब पालवे (पाथर्डी), राजकुमार भानुदास लोखंडे (श्रीगोंदा), खजिनदार- विवेक भानुदास बेरड (नगर) सदस्य- गणेश अशोक झावरे, भाऊसाहेब निवृत्ती खुळे, प्रभाकर सोपान जाधव (राहुरी), विकास संभाजी काळे, सागर बाळासाहेब कल्हापुरे, निलेशकुमार साहेबराव दरेकर, योगेश आदिनाथ कासार, संजय भाऊसाहेब कदम (नगर), ईश्वर दादासाहेब मुरुमकर (जामखेड), अभिजित रोहोकले (पारनेर), हरिभाऊ मच्छिंद्र वायकर, सोमनाथ विष्णूपंत अकोलकर (पाथर्डी), विक्रमसिंह शिवाजीराव जाधव, सोमनाथ वाखारे (श्रीगोंदा), गोपीनाथ जगताप, संपत बावडकर (कर्जत), उदय लक्ष्मण शिंदे, राहुल केशरचंद बंब (शेवगाव)

यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिण युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवकांना या नियुक्तीच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com