भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये

मंदिरं उघडण्यावरून पेढे वाटणाऱ्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा टोला
भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये

मुंबई | Mumbai

दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अखेर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली झाली आहेत. मात्र, करोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्याला परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी म्हंटले आहे कि, "धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं.पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि करोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहे बीजेपीने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये." असा टोला रोहित लगावला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रोहित यांनी मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com