भाजपने महाराष्ट्रात सत्तेची स्वप्न पाहू नये
राजकीय

भाजपने महाराष्ट्रात सत्तेची स्वप्न पाहू नये

पत्रकार परिषदेत दिली माहिती

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

राजस्थानमध्ये कॉंग्रेसने भाजपला चांगली पटकी दिली आहे. आता महाराष्ट्रातही भाजप आशेवर जगत असून त्यांनी महाराष्ट्रात सत्तेची स्वप्न पाहू नये, असा टोला पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

ना.पाटील पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने पीक विमासंदर्भात शेतकर्‍यांवरील जाचक अटी लादून एकप्रकारे अन्याय केला आहे. जळगाव जिल्ह्यात रासानिक खतांचा तुटवडा नाही.

मात्र, मटेरियल उतरविणार्‍या हमाल कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कामगाराअभावी खते येत नव्हते. ४ ते ५ दिवसात रासायनिक खतांचा पुरवठा शेतकर्‍यांना मिळणार असून राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहणार आहे, असे सांगून बोगस बियाण्यांसंदर्भात शेतकर्‍यांनी पावती देवून कृषी विभागाकडे तक्रार करावी, कृषी विभाग त्या कंपनींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com