Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपची माघार : राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध

भाजपची माघार : राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस कडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ही पोटनिवडणूक (rajya sabha byelection) बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. अखेर भाजपने अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोण आहेत रजनी पाटील?

रजनी पाटील या वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात (Marathwada) स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील (Former Minister of State for Sports Ashok Patil) यांच्या त्या पत्नी आहेत. याआधी बीडमधून त्यांनी लोकसभा (Beed Lok Sabha) निवडणूक लढवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या