मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजपा आक्रमक; राज्यभर शंखनाद

मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजपा आक्रमक; राज्यभर शंखनाद

मुंबई | Mumbai

करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे (Corona Restrictions) राज्यातली मंदिरं (Temple) दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा (BJP protest) कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पुण्यातील कसबा गणपतीसमोर (kasba ganpati) सकाळी शंखनाद करुन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. भाजप अध्यात्मिक आघाडी हे आंदोलन करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune city president Jagdish Mulik) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यातील मंदिरे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहेत. सर्व काही व्यवहार सुरु झाले मग मंदिरेच बंद का, केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतो का? असा सवाल अध्यात्मिक आघाडीने राज्य सरकारला केला आहे.

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नेतृत्वात कोल्हार (Kolhar) भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिरासमोर आंदोलन केलं. शंखनाद करतानाच कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्धही संताप व्यक्त केला.'दार उघड दार उघड उद्धवा मंदिराचे दार उघड' यासोबतच 'बाळासाहेब परत या उध्दव ठाकरेंना अक्कल द्या,' 'सर्व मंदिरे खुली झालीच पाहिजेत', अशा घोषणा देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com