Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या घरी पोहोचले चंद्रशेखर बावनकुळे; युतीबाबत केलं महत्त्वाचं विधान

राज ठाकरेंच्या घरी पोहोचले चंद्रशेखर बावनकुळे; युतीबाबत केलं महत्त्वाचं विधान

मुंबई | Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आज राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

- Advertisement -

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता बावनकुळेंनी, युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरीष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

दरम्यान राज ठाकरे यांनी सोमवारी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली होती. या भेटीत फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर काल रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या