Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याLok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; 'या' विद्यमान आमदारांना...

Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; ‘या’ विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भाजपसह (BJP) सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आणि भाजप पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील दौरे वाढले असून महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यासाठी भाजपने मोठी खेळी केल्याचे बोलले जात असून महाराष्ट्र भाजपमधील (Maharashtra BJP) अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

OBC Reservation : ओबीसी महासंघाचे २१ दिवसानंतर उपोषण मागे; OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीसांचे आश्वासन

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी २०२४ ची लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवत भाजपने महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) सध्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून मंत्री गिरीश महाजन, सोलापूरमधून आमदार राम सातपुते, ठाण्यातून मंत्री रविंद्र चव्हाण किंवा संजय केळकर तर दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या अभियानासाठी भाजपने १२ प्रमुख नेत्यांची निवड केल्याचे बोलले जात असून प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात प्रामुख्याने आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांचा समावेश आहे.

भाजपचे ‘या’ जागांवर लक्ष

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जागांसाठीही भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच याठिकाणी असलेल्या १८ विधानसभा मतदारसंघांवर भाजप विशेष लक्ष देणार आहे.

Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होतं १९९३ साली? वाचा सविस्तर

भाजपचा शिवसेनेच्या मतदारसंघांवर डोळा

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचे दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ विधानसभा मतदारसंघांची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपने निवडलेल्या दहा मतदारसंघांवर शिवसेनेचे (Shivsena) वर्चस्व असून या मतदारसंघांवर भाजपचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळण्यावर प्रश्नचिन्ह

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांना (BJP MP) उमेदवारी मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असून महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबईतील (Mumbai) काही जागांवर बदल होण्याची शक्यता असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदारांची गेल्या पाच वर्षांची कामगिरी पाहूनच उमेदवारी देणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ओबीसींच्या आकडेवारीवरून बैठकीत अजित पवारांसोबत खडाजंगी?; छगन भुजबळ म्हणाले….

- Advertisment -

ताज्या बातम्या