Saturday, May 11, 2024
Homeराजकीयपुण्यातील अंशत: लॉकडाऊनला भाजपचा विरोध

पुण्यातील अंशत: लॉकडाऊनला भाजपचा विरोध

पुणे (प्रतिनिधी) –

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संकटाला प्रतिबंध कण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार

- Advertisement -

यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत सात दिवस संचारबंदीसह, शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आजच्या या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला आहे. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या, काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. तसेच संचारबंदी संध्याकाळी सहा ऐवजी आठपासून लागू करण्यात यावी अशी मागणी बापट यांनी केली आहे.

पुण्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय झाल्यानतर गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भुमिका मांडली. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केली. पीएमपीएमल बस बंद करण्यासही त्यांनी विरोद केला असून बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, 40 टक्के क्षमतेनं पीएमपीएमएल बस सुरु ठेवण्याची मागणी बापट यांनी केली आहे. हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपनं केलीय. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या. काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या