आपला बुथ करोना मुक्तीचा संकल्प करा

आमदार भोळे यांचे आवाहन
आपला बुथ करोना मुक्तीचा संकल्प करा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सर्व बुथ व शक्ती क्रेंद प्रमुख यांनी भाजपाच्या घोष वाक्याप्रमाणे मेरा बुथ सबसे मजबुथ याप्रमाणे आता आपला बुथ करोना मुक्त असा संकल्प करावा, असे आवाहन आ.राजूमामा भोळे यांनी यांनी केला.

भाजपा महानगरची ऑनलाइन झुंम मिटींग प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे, खा. सुभाष भांबरे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरची महत्व पुर्ण ऑनलाईन झुम मिटींग रविवारी प्रदेश संघटन मंत्री रवि अनासपुरे, माजी संरक्षणमंत्री तथा शहर पालक खा. सुभाष भांबरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यात करोना महामारीमुळे रक्तदानांचा पुरवठा कमी झाल्यामुळे भाजपातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करणे,कोरोना लसीकरण, जनजागृती, कोरोना चाचणी शिबिर, व आगामी कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले.

मिटींगला प्रास्ताविक महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी केले. सूत्रचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले.

या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, विधानसभा प्रमुख दीपक सारखे, मनोज भांडारकर, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, किसन मराठे, केदार देशपांडे, अजित राणे, संजय लुला, विनोद मराठे, नीलेश कुलकर्णी व अमित साळुंखे उपस्थित होते. आभार नितीन इंगळे यांनी मानले. या ऑनलाईन मिटींग मध्ये जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सर्व आघाडी अध्यक्ष, बुथ व शक्ती क्रेद प्रमुख या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com