भाजपला ज्योतिषी बदलण्याची गरज आहे

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका
भाजपला ज्योतिषी बदलण्याची गरज आहे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुणे |प्रतिनिधी| Pune

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून भाजपकडून (BJP) भाकीतं केली जात आहेत. मात्र, आता त्यांना ज्योतिषी बदलण्याची गरज (The need to change Astrologers) आहे, असा टोला राज्याचे महसूल मंत्री आणि कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) आणि भाजप नेते आशिष शेलार (BJP Leder Ashish Shelar) यांनी भाजपचं सरकार (BJP Government) येणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यांच्या या भाकितावर प्रतिक्रिया व्यक्त करताना थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी टीका (Criticized) केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठावाडा विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण (Flood) झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) या भागांची पाहणी करणार आहेत. त्यावरही थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस नेते (Congress Leder) आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavhan) , अमित देशमुख (Amit Deshmukh) मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचं की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.

आज नितीन गडकरी (Nitin Gadakari) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली. त्यावर ते म्हणाले की, नितीन गडकरी (Nitin Gadakari) आणि शरद पवारांची (Sharad Pawar) भेट होऊ शकते. नितीन गडकरी यांना आम्ही राजकारणापलिकडे बघतो. राजकारण आणि विकास हे वेगवेगळ ठेवलं पाहिजे. काँग्रेस (Congress) हा एक विचार आहे. मला खात्री आहे काँग्रेस (Congress) पुन्हा उभी राहील. हे तुम्हाला लवकरच दिसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.