'उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही'; पदभार स्वीकारताच राणेंचे टीकेचे बाण

'उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही'; पदभार स्वीकारताच राणेंचे टीकेचे बाण

दिल्ली | Delhi

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet reshuffle) झाल्यानंतर आज सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. भाजपचे नेते व खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार स्वीकारला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) पहिला निशाणा साधला आहे. 'शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही' अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

'उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही'; पदभार स्वीकारताच राणेंचे टीकेचे बाण
Modi New Cabinet : डॉ.भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला पदभार, पाहा फोटो

'शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की चांगले काम करा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही पण महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो', अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या खोचक टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की, 'संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचंच असतं. चांगलं नाही वाईटच बोलायचं असतं. संजय राऊत यांना सांगेन खातं बरं वाईट नसतं, तर काम कसं करतो हे महत्वाचं असतं. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खातं चांगलं आणि मोठं होतं असं म्हणतील,' असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

'उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही'; पदभार स्वीकारताच राणेंचे टीकेचे बाण
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

दानवेही अ‍ॅक्शन मोडमध्ये

दरम्यान रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला असून ठाकरे सरकारवर (MVA Government) पहिला निशाणा साधला आहे. 'मुंबईतील लोकल सुरू करण्याचा अधिकार राज्याकडे असून त्यांनी पत्र लिहिले तर लगेच सुरू करू शकतो' असा खुलासा दानवे यांनी केली आहे. रावसाहेब दानवे यांनी आज आपल्या रेल्वे राज्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना दानवे यांनी मुंबई लोकलबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com